राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार आणि रिक्षाचालकांना सॅनिटायझर - मास्कचे वाटप

ठाणे (प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी तथा हेरीटेज मोटार्सचे संचालक सरेंद्र उपाध्याय आणि संतोष तिवारी यांच्यावतीने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या सो मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील सुमारे दोन हजार रिक्षा चालक आणि पत्रकारांना मोफत संनिटायझर आणि मास्कचे वाटप केले. ठाणे शहरामध्ये कोरोनाचा फारसा प्रादर्भाव जाणवला नसला तरी ठाणे शहरामध्ये एक कोरोनाबाधीत रुग्ण सापड ला आहे . या पार्श्वभूमीवर राष्ट्र वादी सो तथा हेरीटेज मोटार्सचे संचालक सुरेंद्र उपाध्याय, राष्ट्रवादीचे ठाणे शहर सरचिटणीस संतोष तिवारी आणि अमीत सरय्या यांनी कोरोनो संदर्भात जनजागृती अभियानही राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी ठाणे शहरातील पत्रकारांना एन ९५ मास्क आणि तसेच, ठाणे शहरातील रिक्षाचालकांनाही मास्क आणि संनिटायझर दिले. नितीन कंपनी, आनंद नगर, कोपरी, ठामपा मुख्यालय आदी ठिकाणच्या रिक्षा स्टंडवर जाऊन हे वाटप करण्यात आले. यावेळी मिलींद बनकर, सचिन रावराणे आदी उपस्थित होतेया संदर्भात सरेंद्र उपाध्याय यांनी सांगितले की. रिक्षाचालकांचा दररोज शेकडो लोकांशी संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांना कोरोनासारख्या विषाणूचा त्रास होण्याची शक्यता असते. तसेच, पत्रकार बांधव आपल्या जीवाची काळजी न करता सामान्यांना कोरोनांच्या संदर्भात माहिती पुरवण्याचे काम करीत असतात. त्यांचाही शेकडो लोकांशी संपर्क येत असतो. त्यामुळेच पत्रकारांनाही संनिटायझर आणि मास्कचे वाटप केले आहे. ही मोहीम अखंडीतपणे सुरु ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ल