ज्येष्ठ कवी, गीतकार डॉ. मुरलीधर गोडे यांचं निधन

___ठाणेः 'प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ | गाणी'... 'मी कशाला आरशात पाह गं? मी कशाला बंधनात राहू गं?'... या आणि अशा असंख्य अवीट गोडीच्या गाण्यांनी रसिकांवर अधिराज्य गाजविणारे कवी, गीतकार डॉ. मुरलीधर गोडे यांचे गुरुवारी निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.मुरलीधर गोडे यांनी ठाणे येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.